Wednesday, July 18, 2007

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥
ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥
तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥
एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥
एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥
सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥
प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥
प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते ॥

Saturday, June 30, 2007

आज मला हा प्रश्न का ?


सरळ सोप्या जीवनात आपल्यानिर्माण झाला हा गुन्ता का?
खेळणारा तर वर बसलाय...
मग आपल्या हाती सोंगट्या का?
प्राजक्ताच्या नाजुक नात्याला ...
प्रेमाचे हे कुंपण का?..
कुरवाळले मी ज्या मनाला....
कोमेजलेले आज पाहते का?
भरुन आलाय "मेघ" जरी....
अबोल माझी घुसमट का?..
घाव तुझ्यावर घालते तरी....
ह्रुदयी माझ्या यातना का?
दुर कुणी वाट पाहतेय.......
माझ्यासाठी तु थांबलास का?..
समजु शकते तुझे दुःख...
तु अन मी ,वेगळे का?...
शेवटी इतकेच विचारते....
शहाणे अंतर होते अपुले...
असेच नेहमी राहील का?...
निरपेक्ष सुंदर मैत्रीची...
साथ नेहमी देशील का?

प्रेम

दोन जिवांच्या मिलनातील....
पापणी ओली करणा~या आठवणीतील...
प्रत्येकाच्या मनात असते....
प्रेम त्या नाजूक भावनेमधील....
निरागस गोड हास्यातील...
चिमुकल्या दोन डोळ्यातील...
अनुभवुन बघ एकदा..
प्रेम त्या बाळाच्या विश्वासातील...
झोपतना ऐकलेल्या अंगाईतील...
कधी मिळणा~या धपाट्यातील...
विसरु नकोस कधी....
प्रेम त्या आईच्या ममतेतील....
पथिकास आराम देणा~या छायेतील...
फळा-फ़ुलांच्या गोडीमधील....
जतन कर नेहमी...
प्रेम त्या पर्यावर्णाच्या संपन्नतेतील...
अथक करणा~या कामामधील...
धेय्य-पुर्तीच्या स्वप्नातील...
चाखायला आवडेल तुलाही...
प्रेम त्या कार्याच्या सिद्धितील...
संकटात देणा~या विश्वासातील...
अवर्णनिय दगडाच्या सामर्थ्यातील...
सदैव स्मरत जा....
प्रेम त्याच्यावरच्या श्रद्धेतील...

एक अजब प्रेमकथा

वसंताच्या साक्षीने बहरुन तो बाहेर आला...
नव्या मित्रांच्या साथीने नवी दुनिया निहारु लागला...
कळत-न-कळत एके दिवशी, त्याचे तिच्याकडे लक्ष्य गेले....
आणि त्यालाही कळले नाही, कधी त्याचे अस्तित्व तिच्यात सामावुन गेले....

ती त्याच्याकडे बघुन, गालात खुदकन हसली...
आणि ते पाहुन आनंदाने, त्याने एक गिरकी घेतली....
हळू-हळू ही कुज-बुज सगळीकडे पसरली...
राजाच्या गुलाम तिच्या बापाने, त्याला इन्द्रछडीही दाखवली....

तरी कधी नाही त्याने, उफ़्फ़ ना आह: केली...
अश्रूंचेही मोती बनवुन, त्याने तिला वाहिली...
दिवस गेले आणि रात्र सुद्धा सरली...
मिलनाची स्वप्ने त्याची, वारयावरच तरळली...

तिच्या प्रेमापायी त्याने, तारुण्याचा त्याग केला...
निरोपाची वेळ आली, हे ग्रीष्म त्याला सांगून गेला...
मरतांनाही तो म्हणाला, जीवन माझे कृतार्थ झाले....
जिवंतपणी नाही, पण मेल्यावर तरी तिने मला जवळ घेतले......

------------------------------------------------------------------

Friday, June 29, 2007

मराठी गोंधळ

पहीला पाउस


Pahila Paus

मराठी जतन करा

तुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे. तर मला मराठी साहित्य ईपत्राने samergawde@gmail.com या पत्त्यावर पाठवा मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

क्षण

पहाटवारा,सोनेरी किरणे,पाखरांची किलबिल चोरपावलांनी हळुच कानाशी गुणगुणतात,मनाला स्पर्श करतात..दिवसभराच्या कामाची तारांबळ...आणि सुस्तावलेली दुपार विचारांची वर्तुळ काढीत सांजेचा मागोवा घेत..सागरकिनारी क्षितिजाचे रंग न्याहाळीत..कातरमनाने सखीला साद घालणारी सांजवेळ कधी लाटांवर तर कधी रिमझिम सरींवर झोके घेत गात गात रात्रीच्या कुशित शिरते..हितगुज करायला चंद्र आहेच..भावनांची सारी आंदोलने प्रकट होतात ..तुमच्याच आनंदाचे हे क्षण....तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा केवळ एक प्रयत्न..

Wednesday, June 27, 2007

शूर आम्ही सरदार

आभार

तुमचा आनंद हाच उद्देश .भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या.मी आपली वाट पाहत आहे.

-- तुमचा समीर